Mon. Aug 19th, 2019

सिंधूचं विजेतेपद हुकलं!

0Shares

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी विजेतेपद मिळवून अंतिम फेरीत हरण्याची  मालिका खंडित करावी अशी इच्छा होती. मात्र जपानच्या अकाने यामागुचीने रविवारी सिंधूच्या विजेतेपदापासून हुलकावणी दिली .

रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरोलिन मरिनकडून झालेला पराभव, गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताच्याच सायना नेहवालकडून मिळालेली हार आणि आशियाई स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपदाने दिलेली हुलकावणी यामुळे या स्पर्धेत तरी तिला विजेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु यावेळीदेखील सिंधूचं स्वप्न भंगलं.

महिला एकेरीची अंतिम लढत 51 मिनिटं रंगली.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अकाने यामागुचीन चौथ्या तर पी. व्ही. सिंधू पाचव्या क्रमांकावर आहे.

या लढतीत अकाने यामागुचीनने सिंधूचा अनुक्रमे 21-15, 21-16 असा सहज पराभव केला.

सिंधू आणि यामागुची 15 वेळा आमने-सामने आल्या आहेत.

यामागुचीनचा सिंधूविरुद्ध हा पाचवा विजय.

यामागुचीनचे वर्षांतील हे तिसरे विजेतेपद ठरलंय.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *