‘पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त…’ शत्रुघ्न सिन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रे शत्रुघ्न सिन्हा यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतींची तुलना बिअरसोबत केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी पेट्रोलची तुलना बिअरसोबत केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या ट्विटमुळे त्यांना सोशयमिडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्यांच्या ट्विटला कमेंट करत एका युझर्सने लिहिले की, ‘चरस, अफीम यापेक्षाही स्वस्त आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकार ते घेतात.’ तर आणखी दुसऱ्या युझर्सने लिहिले की, ‘सर, बिअर पिऊन गाडी चालवण्याची गरज नाही. आपल्याला ११ नंबरची बस पुरेशी आहे.’
शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट केले की, ‘दशकानंतर बिअर आता पेट्रोलपेक्षा स्वस्त झाली आहे. आता नवीन घोषणा फक्त प्या आणि गाडी चालवू नका.’ असे ट्विट करत त्यांनी एका बिअरच्या बाटलीचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत चालल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट केले आहे. मात्र, त्यांनी केलेल्या ट्विटमुळे नेटकऱ्यांकडून सिन्हा चांगलेच ट्रोल होत आहेत.