Thu. Jun 20th, 2019

प. बंगालमध्ये भाजपाकडून 12 तासांचा बंद,पाळणार काळा दिवस

0Shares

लोकसभा निवडणुक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी- भाजपा यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळतच चालला आहे. भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून यामध्ये आठ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात ही घटना घडली आहे. सुकंता मोंडल, प्रदीप मोंडल, तपन मोंडल, देबदास मोंडल अशी मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. तर कुय्यम मोल्लाह असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. या घटनांमुळे भाजपाच्यावतीने सोमवारी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे.शिवाय भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणूनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे

भाजपा आणि टीएमसी वाद सुरुच

पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यात भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

यामध्ये आठ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

निवडणूकीचा निकाल लागून तब्बल 16 दिवस लोटले असतानाही हा हिंसाचार झाला.

कोलकातापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या नयजात येथे भाजपने विजयी रॅली काढली होती.

या रॅलीच्या वेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारानंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

रविवारी देखील दिवसभर या भागात तणावाचे वातावरण होते.

भाजपाच्यावतीने सोमवारी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे.

शिवाय भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: