Thu. Aug 5th, 2021

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाला विरोध

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड केली आहे. त्यांच्या निवडीला विरोध होऊ लागला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे.

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड केली आहे. त्यांच्या निवडीला विरोध होऊ लागला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे. मराठी साहित्यात दिब्रिटो यांचं काम शून्य आहे असा आरोप करत महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड थांबवावी अशी मागणी करण्यात येतं आहे.

मराठी साहित्याचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिकांमधून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड केली जाते. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे आजवरचे लेखन पाहिले असता मराठी साहित्यातील कोणता विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांची आजवरची सर्व पुस्तकं ही ख्रिस्ती धर्मावर आधारित आहेत. ज्याप्रमाणे मदर तेरेसा यांचे काम ख्रिस्ती धर्म वाढीसाठी होतं तसेच दिब्रिटो यांचं लेखनही ख्रिस्ती धर्मासाठी आहे. असं ही बोललं जात आहे.

मराठीचे विचार, मराठी संस्कृती याविषयी त्यांचे कार्य कमी आहे.  मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद बिनविरोध  दिलं जातं याचं स्वागतच करायला हवं. एक दोन जण विरोध करायचाय त्यांना करू देत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो याचं साहित्य मोठं आहे. साहित्यात त्यांच योगदानही मोठं आहे. मराठी साहित्यिकांना धर्माचे निकष कोणी लावू नये. साहित्यिक हा मानवतेचा पुजारी असतो. ते ख्रिचन आहेत म्हणून त्यांना विरोध करू नये. विरोधक प्रसिद्धीसाठी विरोध करत असल्याचं मत साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केलंय. वाद नसताना गेले दोन वर्ष बिगर वादाचे होत आहे. साहित्याला धार्मिक रंग देऊ नये. असेही ते म्हणाले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *