Jaimaharashtra news

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये मोठ्या पगाराची नोकरीची संधी

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसरच्या पदांसाठी 300 जागांची vacancy असल्याचं सांगण्यात येत आहे. या 300 पैकी 122 पदं अनारक्षित आहेत. तसंच जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी 200 जागा रिक्त असून त्यातील 81 जागा अनारक्षित आहेत. या शिवाय स्केल ककक पदासाठी 100 जागा आहेत.

पगार-

1) स्केल-कक पद- या पदावर भरती होणाऱ्या उमेदवारांना महिन्याचा पगार साधारण 31,705 ते 45,950 रुपये इतका असेल.

2) स्केल कककसाठी महिन्याचा पगार साधारण 42,000 ते 51,490 रुपये असेल.

शैक्षणिक पात्रता-

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 60% गुण मिळवून पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.

तसंच संगणकाचं (computers) प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे.

अनुभव-

इच्छुक उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

वय-

उमेदवारांचं वय 35 ते 38 वर्षं असणं आवश्यक

1 एप्रिल 2019 पर्यंत उमेदवाराचं वय 35 किंवा 38 वर्षं पूर्ण असणं आवश्यक आहे.

कसा कराल अर्ज?

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटवर (www.bankofmaharashtra.in) वर login करा.

Home Page वरील option सिलेक्ट करा.

नवीन open झालेल्या web page वरील Career Optionवर क्लिक करा.

दिसणाऱ्या पदांच्या यादीतील इच्छुक असणाऱ्या पदावर क्लिक करून फॉर्म भरा.

संपूर्ण Online Form भरा.

त्यानंतर Online payment करा.

जनरल, OBC, EWS उमेदवारांना परीक्षा शुल्क 1,180 रुपये आहे, तर SC, ST साठी 118 रुपये शुल्क आहे. दिव्यांगांना परीक्षा शुल्कातून संपूर्ण सूट देण्यात आली आहे.

परीक्षा पद्धती-

उमेदवाराला प्रथम Online exam द्यावी लागेल.

त्यातून निवड झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल.

दोन्ही राऊंड्सनंतर निवडलेल्या उमेदवारांना Bank of Maharashtra मध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल.

Exit mobile version