Sun. Nov 28th, 2021

बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलीसांनी केला गोळीबार

कोयना धरण परिसरात बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी  गोळीबार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबट्या अंगावर येण्याची चिन्हे दिसताच हा गोळीबार केला आहे.

कोयना धरण परिसरात बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी  गोळीबार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबट्या अंगावर येण्याची चिन्हे दिसताच हा गोळीबार केला आहे. रात्री 1.30 च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेचा पंचनामा होऊन अहवाल पुढे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली नाही.

नेमकं काय घडलं?

पाटण तालुक्यातील कोयना धरण परीसर अंतर्गत सुरक्षा रक्षक चौकीत रात्री पहाऱ्यावर होते.

सुरक्षा रक्षकाला रात्री 1.30 वाजता दरम्यान बिबट्या दिसला.

बिबट्या अंगावर येण्याची लक्षणे दिसताच सुरक्षा रक्षकाने स्वता: जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार केला.

या गोळीबारामुळे बिबट्याला पळवून लावण्यात यश आलं आहे.

या घटनेचा पंचनामा होऊन अहवाल पुढे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *