बीडमध्ये काही गावात भीषण पाणी टंचाई

पाणी हा सर्वांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे आणि पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. पाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लागतं. पाणी बचाव अशा मोहिमा देखील राबण्यात आल्या. परंतू अशातच मराठवाडा आणि पाणी टंचाई हे काही वर्षां पासून समीकरण बनले आहे. बीड जिल्ह्यात काही गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
बीड शहराच्या जवळच असणाऱ्या वासनवाडी फाटा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो मात्र ते पाणी अशुद्ध आणि दुर्गंध युक्त आहे त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याचा ५ फूट अंतरवरून दुर्गन्ध येतो ते पाणी कसं पिण्यासाठी योग्य असू शकते.