Jaimaharashtra news

बुलडाण्यात एकाच युवतीवर प्रेम, दोन प्रियकरांमध्ये तुफान राडा

एकाच युवतीवर प्रेम असल्याने दोन युवकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना बुलडाण्यातील भिलवाड्यामध्ये घडला आहे. या प्रकरणात या पोलीसांनी युवकांकडून देशी कट्टा आणि काडतूस जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. यातील एका तरुणाकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. गणेश तल्लारे आणि सुभाष कटे या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भूसावळ मध्ये राहणारा गणेश तल्लारे हा गेल्या तीन वर्षांपासून बुलडाण्यात राहण्यास होता. तर सुभाष काटे देखील त्याचभागातील मोताळा मध्ये राहत होता. दोघांचही एकाच मुलीवर प्रेम होते. गणेश त्याच्या प्रेयसीला भेटण्यास गेला असता त्याठिकाणी तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष तिला भेटावयास आला होता.

यामुळे दोघांमध्ये तुफान राडा झाला. गणेश तल्लारेवर त्याच्या जवळील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. स्थानिकांनी याची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही अटक करण्यात आली.

पोलीसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत या दोन्ही आरोपींकडून एकाच मुलीनर प्रेम असल्याने राडा झाल्याचे समोर आले आहे. गणेश तल्लारे यांच्या खिशात देशी कट्टा आणि दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. दोघेही पोलीसांच्या ताब्यात आहेत.

Exit mobile version