Fri. Aug 12th, 2022

‘भाजपा घोडेबाजार करणार नाही’

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आज राज्यसभेसाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा राज्य सभेवर जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबईत माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना फडणवीस म्हणाले, मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा राज्य सभेवर जात आहेत. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली गेली आहे. भाजपाचे अनिल बोंडे हे कृषिमंत्री राहिले आहेत. ते कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ असून पुन्हा एकदा राज्यातून निवडून जात आहेत. याशिवाय कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे आमचे तिसरे उमेदवार असून आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजपाला असल्याचेही त्यांनी सांगिलते केले.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही. कारण आमचे तीन उमेदवार रिंगणात असून ते निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातील महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा म्हणजे घोडेबाजारचा प्रश्न येणार नाही. तरीही त्यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवला तरी आमचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आमचे तीनही उमेदवार राजकारणात असल्याने काही लोक सद्सदविवेक बुद्धीने आमच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक फॉर्म भरला असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.