Wed. Jun 26th, 2019

भारिप कार्यकर्त्यांकडून राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण

0Shares

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये बेदम मारहाण करण्यात आली.  सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये गायकवाड तसंच त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली.

 

भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला जबर मार लागला.

 

मुंबईतलं आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याचं समजते. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

 

गायकवाडांना संतापातून मारहाण करण्यात आल्याचं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलं आहे. तर, प्रकाश आंबेडकरांनी या मारहाणीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: