Sun. Oct 24th, 2021

भीषण! काश्मीरमध्ये मिनीबस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार 22 जण जखमी

काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झाला. या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले असून  तर २२ जण जखमी झाले आहेत.

काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झाला. या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले असून  तर २२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साडेसात वाजता घडला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. यामध्ये मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जातयं.

नेमकं काय घडलं?

मिनीबस केशवान येथून किश्तवाडच्या दिशेने जात होती. मात्र, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बस पलटी होऊन ती दरीत कोसळली.

यात 33 प्रवासी जागीच ठार तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत, असं सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बस घसरून दरीत कोसळली. अपघातातील मृतांचे मृतदेह मिळाले आहेत. मात्र, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *