Mon. Jul 22nd, 2019

भूतिया हलवाई! भूतं बनवतात मिठाई?

0Shares

राजस्थानमधील अजमेर येथे एक असं मिठाईचं दुकान आहे, जिथली मिठाई सर्वत्र प्रसिद्ध आहे, पण दुकानाचं नाव मात्र भयानक आहे. या दुकानाचं नाव आहे ‘भूतिया हलवाई’. हे दुकान ब्रिटिशकालापासून अस्तित्वात आहे. 1933 सालापासून असणाऱ्या या दुकानात भूतं मिठाई बनवत असल्याचं मानलं जातं. या भूतिया हलवाईची ख्याती तर आता देशभरात आहे. लोक येथील डिंकाचे लाडू, पेढे, लस्सी, केशर दूध घ्यायला आवर्जून येतात. भुतांनी तयार केलेली मिठाई किती स्वादिष्ट असते, यासाठी लोक गर्दी करतात.

खरंच भूतं इथे मिठाई तयार करतात?

या हलवायाकडे भूतं रात्री काम करून मिठाई तयार करतात. हिच मिठाई पहाटे ग्राहकांना चाखायला मिळते.

मात्र प्रत्यक्षात या भूतीया मिठाईची वेगळीच गंमत आहे.

1933 साली हे मिठाईचं Sweet Mart लाला मूटचंद गुप्ता यांनी सुरू केलं होतं.

त्यासाठी त्यांनी अलवर गेटजवळील जागा घेतली.

मात्र हा भाग त्या काळात झपाटलेला असल्याचा समजला जाई.

या भागात भूताटकीचा वावर असल्याचं सांगण्यात येई.

त्यामुळे या जागेत लोक सहसा फिरकत नसत किंवा व्यवसायही करत नसत.

तसंच जी काही थोडीबहूत दुकानं या भागात होती, ती देखील सुर्यास्तालाच बंद करून दुकानदार घरी पळत.

रात्री या भागात पिशाच्चं जमा होतात असा समज होता.

त्यामुळे रात्री तर कुणी या भागात फिरकतही नसे.

संध्याकाळनंतर या भागात थांबायची हिंमत कुणातच नव्हती.

लाला मूटचंद यांनी मात्र हिंमत दाखवली.

ते रात्रभर दुकानात बसून मिठाई बनवत राहिले.

त्यामुळे भल्या सकाळीच त्यांच्या दुकानात सर्व ताजी मिठाई तयार होती.

ही मिठाई रात्री कुणी तयार केली, याबाबत सगळीकडे कुजबूज सुरू झाली.

माणूस इथे रात्री थांबून मिठाई तयार करणं शक्यच नाही, असा येथील लोकांचा पक्का समज झाला.

त्यामुळे ही मिठाई भूतांनीच येऊन बनवली आहे, असा लोकांचा पक्का समज झाला.

तर काही लोक मूटचंद हेच भूत असल्याचं मानू लागले.

हे मूटचंद रात्रभर दुकान उघडं ठेवत असत.  त्यामुळे लोकांनी त्यांना ‘भूतिया हलवाई’ म्हणू लागले. याच नावाने आज हे दुकान देशभरात प्रसिद्ध आहे. आता मूटचंद यांच्या पुढच्या पिढ्या हे दुकान चालवतात.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: