भ्रष्ट्राचाराविरोधी भाषणानंतर तासभरातच पोलीस उप-अधीक्षकाला लाचखोरी प्रकरणी अटक
On Anti-Corruption Day, Rajasthan ACB Arrests Own Anti-Corruption Officer For Taking Bribes

वृत्तसंस्था, राजस्थान: राजस्थानात एक अजब घटना घडली आहे. लाच प्रकरणी भाषण देणाऱ्या पोलीस उप-अधीक्षकाला तासाभरात लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन संपन्न झाला.
माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मीणा यांनी भाषण दिल्यानंतर त्यांना लाचखोरी आरोपांखाली अटक करण्यात आली.
या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
दरम्यान, तासाभरात डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली.