Fri. Sep 17th, 2021

मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या दुप्पट!

लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात.

गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे.

या ठिकाणी एक प्रशिक्षित सहाय्यक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे.

ज्या अंध आणि दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल, अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तेथे खासगी वाहन भाड्याने घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *