Sat. Oct 1st, 2022

मतदान भारताचं, लक्ष पाकिस्तानचं!

भारतात सुरू असलेल्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकडे सबंध देशाचं लक्ष लागलंय. मात्र भारताचंच नव्हे, तर शेजारील पाकिस्तानचंही भारताच्या मतदानाकडे बारीक लक्ष आहे.

एकीकडे पुलवामा, बालाकोट सारख्या घटनांमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतात लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. पुलवामा हल्ल्याचा संबंध पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याच लोकसभा निवडणुकांशी लावला होता. तसंच नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारचताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पाकिस्तानला भारताच्या निवडणुकीत विशेष स्वारस्य असल्याचं स्पष्ट होतं. पाकिस्तानच्या ‘ड़ॉन’ या जुन्या आणि मोठ्या वृत्तपत्राने आपल्या website वर भारतीय निवडणुकीचं live blog सुरू केला आहे.

लोकसभेच्या 72 जागांवर सुरू असणाऱ्या मतदानाचं इत्थ्यंभूत अपडेट पाकिस्तानच्या जनसामान्यांपर्यंत या website वरून पोहोचत आहेत.

कोणकोणत्या मतदारसंघातून कोणकोणते उमेदवार उभे आहेत, याचीही यादी पाकिस्तानी जनतेसमोर मांडण्यात आली आहे. कोणकोणत्या VIP, VVIP मतदान केलंय, कोणकोणते सेलिब्रिटी voting करतायत, याची सर्व माहिती पाकिस्तानी जनतेला मिळतेय. या निवडणुकीचा परिणाम पाकिस्तानवरही होणार आहेच.

Bollywood Connection

‘पिंजर’ सिनेमात पाकिस्तानमध्ये अडकून पडलेली ‘पुरो’ साकारणारी उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून लढतेय, तर पाकिस्तानातून आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन परत येणाऱ्या ‘तारासिंग’ची भूमिका साकारणारा सन्नी देओल भाजपतर्फे गुरुदासपूरमधून उभा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना भारतीय निवडणुकांमध्ये चांगलाच interest आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.