Thu. Jun 20th, 2019

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल 40 ते 50 मिनिटं उशिराने धावणार

0Shares

मध्य रेल्वे तब्बल ४० ते ५० मिनिटं उशिराने धावणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या उशीराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ऐन गर्दीच्या वेळेला लोकलचा प्रोब्लेम झाल्याने रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोर जाव लागत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड असल्याने या लोकल उशीरा धावणार आहेत.

ऐेन गर्दीच्या वेळी खोळंबा

दिवा आणि ठाण्याच्या मध्ये गाड्या २० मिनिटं थांबल्या आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ४० ते ५० मिनिटं उशिराने धावणार आहेत.

साडेआठ वाजता दादरला पोहोचणारी लोकल अजूनही ठाण्यातच आहेत.

तर ठाण्याहून कल्याणकडे येणाऱ्या लोकल्सही २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

सिग्नल यंत्रणेत बिघाड असल्याची ठाणे स्थानकात उद्घोषणा करण्यात आली आहे.

तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

काल मान्सूनपूर्व पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

आजही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: