Sun. Jun 16th, 2019

मनपाच्या Swimming Pool मध्ये बुडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू!

12Shares

महानगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून 8 वर्षीय चिमुरड्याचा मुत्यू झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या जलतरण तलावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली.

युग लाडवा असं या बालकाचं नाव असून तो वसई पश्चिम भागातील वसंत नगरी येथील राहणारा होता.

काय घडलं नेमकं?

युग हा नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या बॅचला पोहण्यासाठी आला होता.

यावेळी Swimming pool मध्ये तो बुडाला.

युगला पुढील उपचारासाठी वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात हलवण्यात आलं.

मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

याप्रकरणी महापालिका तरणतलावाचे व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा जीव गेल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याप्रकरणी महापालिकेच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

12Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *