माओवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान जखमी

झारखंड येथील सराकेलाच्या कुचाई भागात माओवाद्यांनी घातपाती कारवाई केली आहे. माओवाद्यांनी केलेल्या LED स्फोटात 18 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांमध्ये ३ झारखंड पोलीस आणि 8 ‘209 कोब्रा’ जवानांचा समावेश आहे.

आज पहाटे 4.53  वाजता कुचाई भागात हा स्फोट घडवण्यात आला. ‘209 कोब्रा जवान’ आणि झारखंड पोलीस विशेष संयुक्त कारवाई दरम्यान हा हल्ला करण्यात आला.

जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी रांचीतील रुग्णालयात हलवण्यात आलंय.

Exit mobile version