Sun. Oct 24th, 2021

मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल – मुख्यमंत्री

मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाखांची मदत दिली जाईल, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले आहे.

मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाखांची मदत दिली जाईल, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले आहे. जखमींचे उपचार आणि त्यांचे पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेणार असं ही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पुण्यातील दुर्घटनेनंतर पुन्हा मालाडमध्ये ही घटना घडली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

40 वर्षातला काल दुसरा मोठा पाऊस पडला. जून महिन्याची सरासरी पाहता प्रचंड मोठा पाऊस पडला

24 तासात 150 मी.मी. पाऊस पडतो. तेव्हा आपण व्यवस्था पाणी बाहेर काढण्याचं काम करू शकतो. मात्र त्यापेक्षा अधिक पाऊस पडला यंत्रणांवर ताण येतो.

मालाड दुर्घटनेत 18 जण मृत, तर 75 जण जखमी आणि 14 लोकांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

सकाळी साडे चार वाजता महापालिका आयुक्तांनी मला फोन करून मालाड दुर्घटनेची माहिती दिली.

मी जखमींची जाऊन विचारपूस केली, तर महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला

ब्रिस्तोवाडच्या प्रकल्पाअंतर्गत 7 प्रकल्प तयार करायचे होते. है टाईडला पाणी तुंबण्यापासून रोखण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

यामध्ये 5 पंपिंग स्टेशन पूर्ण झाले. जागेपासून, परवानग्यांपर्यंत अनेक अडचणी होत्या. अनेक वेळा कोर्टात जावं लागतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *