Sun. May 16th, 2021

Video: मालेगावमध्ये मादक अमली द्रव्य वाहतूक करणारी गाडी ताब्यात

मालेगावात  नाकाबंदी करीत असतांना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव फाट्यावर आज पहाटे अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या गाडीला ताब्यात घेतले आहे.

मालेगावात  नाकाबंदी करीत असतांना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव फाट्यावर आज पहाटे अफू नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणारी गाडी ताब्यात घेतली आहे. पोलीस शिपाई सुभाष चोपडा यांनी इंडिका व्हिस्टा गाडी थांबवून दोन इसमांना धुळेहून नाशिककडे जात असताना मोठ्या शिताफीने गाडी तपासणी केली यात अफूची बोड एकूण-53 किलो ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच एकूण 5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान गाडीची तपासणी करीत असतानाच गाडीत असलेले रतलाम येथील दोघेही फरार झाले. गाडीत फिकट रंगाच्या बँग मध्ये अफु नावाचे अमली पदार्थ वाहतूक व विक्रीसाठी मालेगाव शहराकडे येत असल्याचा संशय होता. फरार दोन्ही इसम मुळचे मध्यप्रदेश मधील रतलाम येथील राहत असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *