मुंबईच्या गांधी मार्केट परिसरात पुल पडल्यामुळे वाहतूक कोंडी

मुंबईच्या किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट परिसरातील पूल पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. हा पूल गेले 8 महिने बंदच होता. त्यामुळे पादचाऱ्यांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत होता. मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यात आता पुलाच्या पडण्यामुले वाहतुकीची कोंडी झालीय. आधीच सायनचा पूल बंद असल्यामुळे लोकांची मोठीच गैरसोय होत आहे. त्यात हा पूलही पडल्यामुले पादचाऱ्यांना, रहिवाश्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय.