Tue. Nov 30th, 2021

मुंबईत क्रिकेटचा सट्टा खेळताना पोलीस अटकेत

क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे.सट्टेबाजांसाठी ही पर्वणीच आहे. अशा सट्टेबाजांवर पोलिसांची विशेष नजर आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड असा सामना होत असताना त्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना माटुंगा पोलीसानी रंगे हाथ पकडले आहे.

क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे.सट्टेबाजांसाठी ही पर्वणीच आहे. अशा सट्टेबाजांवर पोलिसांची विशेष नजर आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड असा सामना होत असताना त्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना माटुंगा पोलीसांनी रंगे हाथ पकडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये मुंबई पोलीस दलात काम करीत असलेला एक पोलीस उपनिरीक्षक यात शामिल होता.

सट्टेबाजांवर पोलिसांची नजर

25 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड अशी क्रिकेट मॅच सुरु असताना आरोपी दादरमधे एका हॉटेलच्या सातव्या माळ्यावर मोबाईल द्वारे सट्टा लावून जुगार खेळात होते. याची खबर माटुंगा पोलिसांना मिळली माटुंगा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

यात आरोपी मिकीन शहा , मनीष सिंग , प्रकाश बँकर यांना ताब्यात घेतले तसेच भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला ज्ञानेश्वर खरमाटे यालाही ताब्यात घेतलं आहे.

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे , तर पोलीस खात्यात असलेल्या ज्ञानेश्वर खरमाटे याला पोलीस खात्यातून निलंबन करून त्याची चौकशी लावण्यात आली आहे.

, www.lotusbook247.com या वेब साईड द्वारे हे सर्व जण जुगार खेळत होते , यामागे देश आणि विदेशातून किती जण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *