Fri. Aug 12th, 2022

मुंबईत दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्ती

आपण पाहतो की मुंबईत मोटार सायकल वरून प्रवास करणारे बरेसचे नागरिक आहेत. पण दुचाकीवरून प्रवास करत असताना बरेसचे लोकं हेल्मेटचा उपयोग करत नाहीत, तसेच मागे बसलेला व्यक्ती सुद्धा हेल्मेटचा वापर करत नाही, परंतू अशा लोकांसाठी आता हेल्मेट घालणं बंधनकारक केले आहे. या संबंधित प्रसिद्धीपत्रतकातून वाहतूक पोलिस मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवित असताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक असेल, पुढील पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकीस्वाराचा ३ महिन्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मोटार सायकलस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या १५ दिवसानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.