Wed. Dec 1st, 2021

मुंबई तुंबली नाही, थांबली नाही, पालिका उपायुक्तांचा अजब दावा

एकीकडे मुंबईची झालेली ही अवस्था आणि दुसरीकडे मुंबई तुंबली नाही, थांबली नाही असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.

चार दिवसाच्या पावसानंतर मुंबईची दैना झालेली पाहायला मिळाली आहे. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत लोकलची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ठिकठिकठिकाणी मुंबईत पाणी साठले आहेत. एकीकडे मुंबईची झालेली ही अवस्था आणि दुसरीकडे मुंबई तुंबली नाही, थांबली नाही असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे. निप टाईड आल्याने मुंबईतील पाण्याचा निचरा झाला नाही असं म्हणत पालिका अधिकाऱ्याने जबाबदारी झटकली आहे.

महापालिका उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांचे स्पष्टीकरण

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हिंदमाता मधील झाडांची पुनरोपण करायची परवानगी दिली आहे, त्यांनतर काही झाडे काढुन हिंडमताच्या पर्जन्य जलवाहिनीच काम होईल.

मागच्या 7 दिवसात 4270 तक्रारी या आपत्कालीन विभागांना आल्या आहेत याच निराकरण केलं गेलं.

52 हॉटेलाईन आहेत यात 22 सरकारी नंबर आहेत. एकूण 6 महत्वाचे पँम्पिंग स्टेशन आहेत यात 32 पंप वापरले आहे

315 पैकी 287 ठिकणी पंप चालवले आहेत. ट्विटर ही ऍक्टिव्ह होऊन महापालिकेने तक्रारी घेतल्या आहे.

काही नागरिकांनी ट्विटर च्या माध्यमातून नाराजी केलेली आहे..mybmC या ट्विटरवर टाकण्यात आलं आहे.

24 वॉर्डसाठी त्या त्या विभागाचे ट्विटर अकाउंट सुरू केले आहे. 40 ते 45 लोकांनी ट्विटर हँडल चांगलं असल्याचं म्हंटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *