Fri. Aug 6th, 2021

मुलगी दहावी पास झाल्याने वाटले पेढे… आणि सात जण रुग्णालयात दाखल

दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानात आणलेले पेढे खाल्याने उत्तीर्ण विद्यार्थिनीसह एकाच कुटुंबातील पाच अशा सात जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्रनगर नं.2 मधील संभाजीनगर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.

एकदम7  जणांना विषबाधा

दहावीच्या निकालात संभाजीनगर येथील दुर्गानंद सदगीर ही विद्यार्थिनी 56 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

मुलगी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात कुटुंबियांनी मिठाईच्या दुकानातून आणलेले पेढे वाटले.

पेढे खाताच उलटी व जुलाब सुरु झाल्याने विद्यार्थिनीसह सात जणांना हारगुण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सर्व बाधितांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने सर्वांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

दरम्यान,या कुटुंबाने घरानजीकच्या हनुमान डेअरी अँड बंगाली स्वीट्स या मिठाईच्या दुकानातून मिठाई आणल्याची माहिती समोर आली आहे.

पेढे व तत्सम मिठाईसारख्या खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाब सुरु झाले.

सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर उमेश गौतम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *