Jaimaharashtra news

मुलगी नकोशीच; महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर आठ टक्क्यांनी घसरला

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुलगी नकोशीच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि तेही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अहवालात.

 

2016 मध्ये तब्बल आठ टक्क्यांनी मुलींचा जन्मदर घसरला आहे.  2015 मध्ये 1000 मुलांमागे 907 मुली होत्या तिथे 2016 मध्ये हा आकडा 899 वर पोहोचला आहे.

 

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट झाली आहे. तर पुण्यासह उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी मुलींचा

जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे.

 

 

राष्ट्रवादी आमदार जितेद्र आव्हाड यांनी यावर मोठी चिंता व्यक्त केली. आधी आपण इतर राज्यांना हसायचो आता आपल्यावरच ती वेळ ओढावलीय अशी टिका त्यांनी केली.

Exit mobile version