Thu. Sep 29th, 2022

मूसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे पुण्यात

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हत्याकांडाचे धागेदोरे पुण्यात गवसले असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन शार्प शुटरला अटक केल्याचं समजतयं. त्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली असून तपासासाठी त्यांना पंजाबमध्ये नेले जाणार आहे. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी त्याला मारले असावे असा शंशय आहे. पंजाब पोलिसांनी रविवारी रात्रीच दोघांना पुण्यातील अटक केली आहे. त्यांना पंजाब मध्ये नेऊन कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.

मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.

पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.