Fri. Jul 30th, 2021

मैदानावर अश्लील हावभाव केल्याबद्दल रोनाल्डोला जबर दंड!

फुटबॉल जगतात आघाडीचं नाव असणारा पोर्तुगाल टीमचा कॅप्टन ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानावर गैरवर्तवणूक केल्यामुळे अडचणीत आलाय. जुवेंट्स आणि अटलेटिको माद्रिद सामन्यांदरम्यान त्याने केलेल्या असभ्य हावभाव प्रकरणी 20,000 युरो (15,62,000 रुपये) चा जबर दंड त्याला आकारण्यात आलाय.

काय घडलं नेमकं?

चॅम्पियन्स लीगचे सध्या फुटबॉल सामने चालू आहेत.

या सामन्यांदरम्यान रोनाल्डोने एका गोलच्या सेलिब्रेशनच्या वेळी आक्षेपार्ह वर्तन केलं.

जुवेंट्स आणि अटलेटिको माद्रिद यांच्यातील सामन्यांदरम्यान सुरूवातीला अटलेटिको माद्रिदचे कोच दिगो सिमेओन यांनी त्यांच्या संघाच्या पहिल्या गोलवर प्रेक्षकांकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले होते.

पण त्यानंतर रोनाल्डोनेही गोल केल्यावर त्यानेही दिगोंप्रमाणेच आपल्या ट्राउजरमध्ये हात घालत आक्षेपार्ह हावभाव केले.

या प्रकरणी अटलेटिको माद्रिदचे कोच दिगो सिमोओन यांना तसंच रोनाल्डोला 20,000 युरो (15,62,000 रुपये) इतका दंड आकारण्यात येतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *