Mon. Jul 26th, 2021

मोदींच्या शपथविधीचं आमंत्रण इम्रान खान यांना नाहीच!

‘नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत’ अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनाच नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे मोदी सरकार दुसऱ्या टर्ममध्येही पाकिस्तानशी आक्रमक धोरणच राबवणार असल्याचंच यातून सूचित होतंय.

इम्रान खान यांना निमंत्रण नाहीच

30 मे 2019 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला ‘बिम्सटेक’ देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

बिम्सटेक देशांमध्ये भारताबरोबरच बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि भुतान, किरगिझस्तान मॉरिशस आणि थायलंड या देशांचा समावेश आहे.

मात्र या निमंत्रणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा समावेश नाही.

शेजारी राष्ट्रांना निमंत्रित करतानाच त्यातून पाकिस्तानचं नाव वगळल्याने मोदी सरकारने पाकिस्तानाला दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असाच संदेश दिल्याचं बोललं जात आहे.

2014 साली होतं नवाज शरीफ यांना आमंत्रण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी सार्क देशांना आमंत्रित केलं होतं.

यांमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ हे देखील होते.

मात्र त्यानंतरही गेल्या 5 वर्षांत भारत- पाकिस्तान यांच्याती संबंध अधिकाधिक तणावपूर्णच होत गेले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान निवडून आल्यावर त्यांनी जरी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी दहशतवादी कारवायांवर कोणतंही नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश आलं नाही.

त्यामुळेच दहशतवादी हल्ले आणि समेटाच्या चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, या आपल्या भूमिकेवर भारत ठाम असल्याचं दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *