Sun. Aug 25th, 2019

‘मोदी सरकार’ऐवजी यंदा ‘भाजप परिवार’!

146Shares

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरूवात होऊ लागली आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आक्रमकपणे प्रचार केला होता. इतर पक्षांच्या आधीच आपल्या पंतप्रधानपदाचा उमेदवारही घोषित करून त्यांनी मोदींच्या नावाने घोषणा तयार केल्या होत्या. ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ यांसारख्या घोषणांमधून नरेंद्र मोदींचं नाव दुमदुमू लागलं. मोदी लाट तयार झाली. त्याचा भाजपला निश्चितच फायदा झाला. मात्र आता मोदी लाट ओसरली की काय, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात करतानाच भाजपच्या घोषवाक्यांमधून मोदींचं नाव त्यात दिसेनासं झालंय.

 

मेरा परिवार भाजप परिवार!

2014 साली भाजपच्या घोषणा ‘अब की बार मोदी सरकार’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा होत्या.

मात्र निवडणुकांनंतर मोदी यांच्यावर हुकुमशाहीचे, सत्तेच्या केंद्रीकरणाचे आरोप होत आहेत.

विरोधक मोदींच्या हुकुमशाही वृत्तीवर तुटून पडत आहेत.

शिवसेना आणि इतर अनेक मित्रपक्षही मोदींना विरोध करू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने ‘मेरा परिवार भाजप परिवार’ असा नारा दिला आहे.

गांधी घराण्याच्या परिवारवादावर टीका करत असल्यामुळेच आपण घराणेशाही मानत नसल्याचं या नाऱ्यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

तसंच भाजपवर संघ परिवाराचा दबाव असल्याची टीकाही वारंवार होत असते.

याचाच विचार करून मोदी केंद्रीत घोषणा न ठेवता यावेळी ‘मेरा परिवार भाजप परिवार’ची घोषणा देण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

 

मोदी लाट ओसरली?

मोदींच्या नावाने आता पहिल्यासारखी मतं मिळणार नाही, या भीतीनेच घोषणांमधून मोदींचं नाव प्रचारातून काढल्याचा निष्कर्ष विरोधकांनी काढला आहे.

तर एका घोषणेत मोदींचं नाव नाही, म्हणजे त्यांना वगळण्यात आलंय असा त्याचा अर्थ होत नाही, अशा स्वरूपाचा युक्तीवाद भाजप समर्थक करत आहेत.

मात्र एकीकडे मोदींऐवजी नितीन गडकरींकडे असणारा भाजप कार्यकारिणीचा ओढा, मित्रपक्षांची इच्छा आणि विरोधकांच्या टीकेचा भडिमार या सर्वांचा विचार करता मोदीकेंद्रीत प्रचार बदलून भाजपकेंद्रीत प्रचार सुरू झाल्याचं चित्र आत्तातरी दिसू लागलंय.  अर्थात असं जरी असलं, तरी पोस्टरवर फोटो मात्र नरेंद्र मोदींचाच आहे.

146Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *