Wed. Jun 23rd, 2021

म्हणून खासदाराने ठोकला DSP ला सलाम!

अनेक खासदार, मंत्री यांचं पद मिळताच इतरांशी वागण्याची पद्धत बदलून गेल्याची उदाहरणं दिसून येतात. मात्र आंध्र प्रदेशातील एका खासदाराने चक्क DSP ला सॅल्युट केल्याचा एक फोटो व्हायरल होतो आहे. YSRCP चे खासदार गोरंता माधव यांचा हा फोटो आहे. या फोटोमागची कहाणीही गमतीदार आहे.

पोलीस की खासदार?

बहुतेकदा खासदार, मंत्री हे पोलिसांना आपले सेवक असल्याप्रमाणे वागवत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.

मात्र गोरंता माधव यांची गोष्ट वेगळी आहे.

आंध्र प्रदेशा यंदा YSRCP ने TDP ला धोबीपछाड दिलाय.

हिंदूपूर मतदारसंघात YSRCP चे गोरंता माधव विजयी झाले.

मात्र खासदार होण्यापूर्वी गोरंता माधव हे पोलीस दलात नोकरीला होते.

अनंतपूर जिल्ह्य़ात ते सर्कल इन्स्पेक्टर होते.

त्यावेळी फोटोतील DSP हे त्यांचे वरीष्ठ अधिकारी होते.

विशेष म्हणजे आपले साहेब दिसताच खासदारकीला उभ्या असणाऱ्या माधव यांनी DSP यांना कडक सलाम ठोकला. त्यानंतर DSP  यांनीही त्यांना सलाम केला.

हा व्हायरल झालेला फोटो 23 मे रोजी काढण्यात आला. त्यावेळी मतमोजणी सुरू होती.

माधव अनंतपूर येथे ड्युटीवर असतानाच TDP नेते आणि माजी खासदार जेसी दिवाकर रेड्डी यांनी पोलीस दलासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं. याच गोष्टीमुळे चिडून राजकारणात उतरण्याचा निश्चय त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *