Mon. Dec 9th, 2019

…म्हणून निवडणुकीत राजू शेट्टींचा पराभव

राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला. 2014 मध्येही त्यांनी त्यांचा गड राखला होता. परंतु शेतकरी नेते राजू शेट्टी यांची हट्रिक रोखत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी संसद गाठली आहे. माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांची हट्रिक रोखत शेट्टींनी शिवार ते संसद प्रवास केला होता. शेट्टींच्या पराभवाची कारणे देखील तशीच आहेत.

हातकणंगले मतदार संघाचा धक्कादायक निकाल

राज्यातल्या धक्कादायक मानल्या जाणाऱ्या निकालात हातकणंगले मतदार संघातील निकालाचा समावेश आहे.
निकालाच्या सर्व्हेचा अंदाज चुकवत या मतदार संघात राजू शेट्टीना पराभवाला सामोरे जावे लागलंय.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची मोट बांधत त्यांना हक्काची जाणीव करून देत शिवार ते संसद झेप घेतली होती.
शेतकरी ठरवलं तोच खासदार अशी अवस्था या मतदार संघाची होती त्यामुळे शेट्टींनी दोन वेळा निर्विवाद प्रतिनिधित्व केले होते.
यावेळच्या निवडणुकीत मात्र शेट्टींचे अनेक निर्णय चुकले याचा फटका त्यांना बसला.

राजू शेट्टींच्या पराभवाची कारणे

विरोधी पक्षासोबत आंदोलन करणं शेट्टींना महागात पडलं.
सत्तेत असताना सुद्दा विरोधकांसोबत आंदोलन करत असल्याचा मुद्दा निवडणुकीत उचलून धरला.
मोदी सरकारच्या सत्तेतून बाहेर पडून सरकारवरच त्यांनी ताशेरे ओढले.
देशभरातील शेतकऱ्यांना घेवून संसदेवर भाजपाविरोधात मोर्चा काढल्याने भाजपाने त्यांना पराभूत करण्याचा निर्णय घेतला.
त्यातच सदाभाऊ सारखा शेट्टींचा कार्यकर्ता हाताला लागल्याने त्यांना बळ देऊन शेट्टीना घेरण्याची भाजपची व्यवहरचना यशस्वी झाली.
स्वतःच्या फायद्यासाठी शेट्टी कार्यकर्त्यांचे बळी देत असल्याचे लोकांसमोर मांडण्यात सदाभाऊ यशस्वी ठरले.
जातीचा फॅक्टर या मतदार संघात मोठ्या प्रमाणात चालला.
तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली 1 लाख 23 हजारांची मते सेनेला बळ देऊन गेली.
शेट्टींना स्वप्नातही आपला पराभव होईल असे वाटत नव्हते मात्र जनतेला गृहीत धरून राजकारण केले.
तर त्याचे परिणाम काय होतात याचा धडा मतदारांनी शेट्टीना घालून दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *