म्हणून शेतकऱ्याच्या मुलीनेच केली आत्महत्या
जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं चक्र थांबताना दिसत नाही. पण, आता लातूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलीनंच आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.
कर्जबाजारी शेतकरी बापाला आपल्या लग्नाचा त्रास होऊ नये म्हणून या मुलीनं स्वतच जीवन संपवलं आहे.
शेतात अनेक वर्षांपासून नापिकीमुळे पैसा नाही. कर्जाचे हफ्ते फेडून बाप कर्जबाजारी झालेला. लग्न करण्यासाठी हुंड्याला द्यायला पैसे नाहीत. कोणतीही बँक किंवा सावकार कर्ज देत नाही. याच विवंचनेतून 21 वर्षाच्या शीतल वायाळ या मुलीनं टोकाचा निर्णय घेतला.
गेल्या दोन वर्षांपासून तीचं लग्न हुंड्यामुळे मोडत होतं. पण या हुंड्यापायी आपल्या बापाला जमीन विकावी लागू नये म्हणून शीतलनं विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. लातूर जिल्ह्यातील भिसे गावातील या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.