Mon. May 17th, 2021

‘या’ अटीवर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
त्यांना भारताबाहेर न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच 1 लाख जातमुचलक्यांवर हा जामीन मंजूर करण्याच आले आहे.
चिदंमबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटक  झाली होती. मात्र आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे चिदंबरम घरीच दिवाळी साजरी करणार आहेत.
काय आहे आयएनएक्स प्रकरण ?
यएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे.
हे प्रकरण २००७मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.
या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *