Fri. Jan 28th, 2022

या कारणास्तव सहा वर्षीय बालकाला निर्वस्त्र करून दिले चटके

निर्वस्त्र करून सहा वर्षीय बालकाला तापत्या स्टाइल्सवर बसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरात चोरी केल्याचा आळ या मुलावर घालण्यात आला होता. यावर त्याला ही शिक्षा देण्यात आली. यामध्ये त्या मुलाला गंभीर स्परुपाची इजा झाली आहे. आर्यनला त्वरित सामान्य रुग्णालय अर्वी येथे पाठविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

….म्हणून ही शिक्षा

आर्वी येथील गजानन खडसे यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यन खडसे हा खेळत होता.

आर्यन हा नेहमीप्रमाणे जोगना माता मंदिराच्या प्रांगणात खेळायला गेला होता.

तो खेळत असताना त्याठिकाणी उमेश उर्फ अमोल ढोरे आला,

तु मंदिरातून पैसे चोरले आहे असे म्हणत आर्यनला मारहाण करीत त्याला निर्वस्त्र केले.

दोन्ही हातपाय बांधून मंदिराच्या आवारात स्टाइलवर बसवले यात आर्यनचा मागील पृष्ठभाग गंभीर रूपाने भाजला गेला.

आर्यनला त्वरित सामान्य रुग्णालय अर्वी येथे पाठविण्यात आले.

आर्वी पोलिस स्टेशनने गुन्हा दाखल करीत तातडीने आरोपीचा शोध घेवून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *