Sat. Jul 31st, 2021

या नेत्यांची मोदींच्या शपथविधीला अनुपस्थिती 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी जवळपास 8 हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथविधीपूर्वी महात्मा गांधींना आणि अटल बिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळावर आदरांजली वाहिली आहे. तर राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांनाही वंदन केलं आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद उपस्थित राहणार आहे. पण राजकीय हत्या झाल्याच्या भाजपच्या आरोपांमुळे ममता बॅनर्जींचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला आणखीही दिग्गजांची अनुपस्थिती असणार आहे.

या नेत्यांची शपथविधीला अनुपस्थिती

1. ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प. बंगाल
– कारण-  राजकीय हत्येचा आरोप लावल्याच्या निषेधार्थ बहिष्कार
2. कॅप्टन अमरिंदर सिंह, मुख्यमंत्री पजांब
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
3. जोरमथांगा,  मुख्यमंत्री, मिजोरम 
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
4. प्रेमा खांडू,  मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश- वेळ नाही
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
5.  पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
6. नवीन पटनायक, मुख्यमंत्री, ओडीशा
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
7. कमलनाथ, मुख्यमंत्री,  मध्यप्रदेश
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका
8. भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगढ
कारण- वेळ नाही, नियोजीत बैठका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *