Sat. May 25th, 2019

‘या’ वैशिष्ट्यांमुळे Surgical strike 2 साठी निवडलं ‘मिराज 2000’…

172Shares

पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत भारतीय वायू दलाने या हल्ल्याचा बदला घेतलाय. 26 फेब्रुवारी रोजी भारताच्या वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हवाई हल्ला केला. या हल्ल्यासाठी भारतीय Air Force ने 12 मिराज 2000 विमानांचा वापर केला. आपल्याकडे एकाहून एक फायटर जेट्स असताना मिराज 2000 सारखं प्राथमिक विमान वापरण्यामागील नेमकं कारण काय असावं, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मिराज 2000 च्या ज्या खास वैशिष्ट्यांमुळे त्यांचा वापर केला, होता ती अशी…

1985 मध्ये मिराज भारतीय वायू सेनेत दाखल झालं.

मिराज 2000 चं नामकरण ‘वज्र’ करण्यात आलंय.

कारगिल युद्धातही पाकिस्तानची या मिराज 2000 विमानांनीच दाणादाण उडवली होती.

या मिराज 2000 चा सर्वाधिक वेग 2,495 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

हे मिराज 2000 लेजर गाइडेड बॉम्बनेही हल्ला करू शकतं.

बालाकोटवरील हल्ला भारताने याच पद्धतीने केला असल्याचं सांगण्यात येतंय.

नव्या मिराज मध्ये रडार आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे. ज्यामुळे विमानांची भेदक मारा करण्याची शक्ती वाढली आहे.

अगदी छोट्या रनवेवरूनही हे विमान उड्डाण करू शकतं.

आपल्या वजनाएवढा बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र मिराज 2000 वाहून नेऊ शकतं.

हवेमध्ये असताना हवेतल्या हवेतच एकावेळी शत्रूच्या दोन विमानांशी सामना करण्याची क्षमता मिराज 2000 मध्ये आहे.

मिराज 2000 जमिनीवरही एकाचवेळी 2 वेगवेगळी लक्ष्यं भेदू शकतो

मिराज 2000 चं वजन 7,500 किलोग्रॅम आहे.

13,800 किलोग्रॅम वजनाइतकी शस्त्रास्त्रं हे विमान वाहून नेऊ शकतं.

ज्यावेळी पाकिस्तानी हद्दीमध्ये मिराज 2000 घुसलं, तेव्हा भारतीय वायूसेनेच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने F16S विमानं हवेत उडवली. मात्र मिराज 2000 च्या शक्तीचा अंदाज असल्यामुळे पाकिस्तानी विमानं उलटी फिरून पळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *