Fri. Aug 12th, 2022

युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या नवीनच्या कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून सांत्वन

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा (वय २१) कर्नाटकातील राहणारा होता. या विद्यार्थ्याचा खारकिव्हमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शेखरप्पाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शेखरप्पाच्या वडिलांना फोन लावून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

युक्रेनमधील खारकिव्हमध्ये आज सकाळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्यांचे नाव असून ते कर्नाटकातील हा रहिवासी आहे. तसेच या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले  आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी रशिया आणि युक्रेनच्या राजदुतांशी संवाद साधला. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच युक्रेनच्या अनेक भागांमध्ये अनेक भारतीय अडकले असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.