Thu. Sep 29th, 2022

रणवीर सिंह मुंबईत येताच कारवाई होणार

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. ज्यावरून रणवीरही वाद विवादांनी घेरला होता. एका व्यक्तीने तर रणवीर सिंगविरोधात एफआयआरही दाखल केला होता. रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट पाहून महिलांच्या मनात लाजीरवाणी भावना निर्माण होईल, असे तो म्हणाला होता. रणवीरचे न्यूड फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून हटवण्यात यावेत, अशीही त्यांची मागणी होती. या संदर्भात मुंबई पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले होते. चेंबूर पोलीस रणवीर सिंगला नोटीस बजावण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्याला ही नोटीस १६ ऑगस्टपर्यंत सोपवायची आहे, मात्र अभिनेता रणवीर सिंह हा मुंबईबाहेर गेला आहे. तो घरी न सापडल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. रणवीर सिंगला २२ ऑगस्टला चेंबूर पोलिसात हजर राहावे लागेल, असे नोटीसमध्ये लिहिले आहे. रणवीरविरुद्ध आयपीसी कलम ५०९, २९२, २९२, आयटी कायद्याच्या कलम ६७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीर सिंगने पीपल मॅगझिनसाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. वाढत्या वादामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने त्याला पाठिंबा दिला. त्यात आलिया भट्ट, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, मसाबा गुप्ता, अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिया मिर्झा, राम गोपाल वर्मा, पूनम पांडे यांचा समावेश आहे. या न्यूड फोटोशूटसाठी दीपिका पदुकोणनेही रणवीर सिंगला सर्वाधिक सपोर्ट केला. या शूटिंगदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पती रणवीरसोबत राहिली. रणवीरला या फोटोशूटसाठी तिने आत्मविश्वासही दिला. अशाही बातम्या बाहेर आल्या होत्या, मात्र याबाबत दीपिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.