Wed. Dec 8th, 2021

पावसाचा फटका नेत्यांनाही, राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांसह ‘हे’ नेते एक्सप्रेसमध्ये अडकले

सकाळापासून पावसाने मुंबईला झोडपले आहे. मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. अनेक स्थानंकांवर पाणी साचल्याने लोकल धीम्या गतीने सुरू आहे. याचा फटका फक्त सामान्यांना बसत नसून नेत्यांनाही बसला आहे.

सकाळपासून पावसाने मुंबईला झोडपले आहे. मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. अनेक स्थानंकांवर पाणी साचल्याने लोकल धीम्या गतीने सुरू आहे. याचा फटका फक्त सामान्यांना बसत नसून नेत्यांनाही बसला आहे. देवगिरी एक्सप्रेस सायनजवळ बंद पडल्यामुळे काही आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत.

सकाळपासून सफाळे, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच लालबाग, वांद्रे, सांताक्रूज परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरमध्येही पाऊसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे मुंबईमध्ये जनजीवनावर याचा परिणाम झालेले आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही लोकलमध्ये अडकले आहे.

अधिवेशनाला आलेले नेते अडकले

पावसाचा फटका सामान्यजणांसह नेत्यांनाही बसला आहे. देवगिरी एक्सप्रेस सायनजवळ बंद पडल्यामुळे काही आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही या एक्सप्रेसमध्ये आहेत.

डोंबिवलीहून आ.चव्हाण विधान सभेच्या कामकाजासाठी निघालेले होते.अधिवेशनात लवकर जाता यावे यासाठी चव्हाण रेल्वेनं जात होते. मात्र पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने तेही अडकले आहेत.

रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असून पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरल्याने अनेक स्थानकांवर पाणी साचले आहे.

मुंबईमध्ये अनेक स्थानंकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. वाहतूक खोळंबल्यामुळे या गर्दीत वा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *