Wed. Jun 23rd, 2021

राज्यात 4 लाख 88 हजार मतदारांनी स्वीकारला ‘NOTA’!

लोकसभा निवडणुकीत यावेळी राज्यात 4 लाख 88 हजार ‘NOTA’ चा पार्याय मतदारांनी निवडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात सर्वात जास्त याच प्रमाण पाहायला मिळतंय.

जर मतपत्रिकेवरील कोणताही उमेदवार पसंत नसेल तर पर्याय म्हणून ‘NOTA’ चा वापर अर्थात ‘नन ऑफ द अबोव्ह’चा वापर केला जातो. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीचा निकालावर एक नजर टाकली असता यावेळी राज्यात 4 लाख 88 हजार 766 इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या काही  निवडणुकांमध्ये नोटांचे प्रमाण वाढल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पालघरमध्ये सर्वाधिक NOTA चा वापर करण्यात आला असून 29 हजार 479 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. त्या खालोखाल गडचिरोली चिमूर मतदारसंघात 24 हजार 599 मतदरांनी NOTA चा पर्याय वापरला आहे. तर सगळ्यात कमी NOTA चा वापर बीड आणि धुळे या मतदारसंघात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येतेय.

 

सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झालेले पाच मतदारसंघ-

1) पालघर – 29479

2) गडचिरोली- चिमूर – 24599

3) नंदुरबार – 21925

4) ठाणे – 20426

5) उत्तर-पश्चिम मुंबई – 18225

दरम्यान एकंदरीत आकडेवारी पाहिली तर पालघर, गडचिरोली, ठाणे आणि नंदुरबारमध्ये आदिवासी समाज देखील राहत असून, याच भागात नोटाचे प्रमाण वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कदाचित अक्षिक्षित मतदारांना नेमकं बटण कोणते दाबायचे हे कळत नसल्यामुळे ते शेवटचे बटन दाबून मोकळे होत असावे असा अंदाज काही जानकरांनी बोलून दाखवला.

दुसरीकडे मुंबई सारख्या सुक्षिक्षित भागात देखील नोटाचे प्रमाणे वाढल्याचे पहायला मिळतंय.

दक्षिण मुंबई 15115,

ईशान्य मुंबई – 12416,

उत्तर पश्चिम मुंबई – 18225,

दक्षिण मध्य मुंबई – 13834,

उत्तर मुंबई – 11966,

उत्तर मध्य मुंबई -10669

इतक्या मतदारांनी NOTA ला पंसती दिली आहे. शेवटी काय मागील दहा वर्षांत NOTAचा पार्याय जास्त प्रमाणात स्वीकारलाय असं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *