Mon. Dec 6th, 2021

राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तेराव्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी  मुंबईत सभेला संबोधीत केले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकून टिका केली आहे.पुलवामा हल्ला,राफेल प्रकरणावरुन मोदी फकीर नसून बेफिकीर आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

 आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी कोण ?

आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण?   या शब्दात त्यांनी मोदीवर टीका केली आहे.

भाजपवाले सोयीची राष्ट्रभक्ती करतात ,भाजपने राष्ट्रभक्तीचा ठेका घेतलाय का?  असा सवाल देखील त्यांनी केला.

जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर  तुम्ही शरीफांच्या वाढदिवसाला लाहोरला जाऊन केक का भरवता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर नाही तर बेफिकीर आहेत असे ते म्हणाले.

 

अमित शाह को-पायलट होते का?

हवाई हल्ल्यात 250 दहशतवादी मारले गेले असे अमित शहा म्हणतात.

किती जण ठार झाले ते मोजायला अमित शहा गेले होते का ?

ते को- पायलट होते का ? असे म्हणत शाह यांची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

 

पुन्हा पुलवामासारखी घटना घडू शकते

पुढच्या काही दिवसात पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल आणि राष्ट्रभक्तीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल,

मोदीच्या आयटी सेलची लावारीस पोर भाजपाचा आयटी सेल चालवत असून फक्त संदेश फॉरवर्ड करनं याचं काम असतं.

ही पोर युद्धाला चिथावणी देण्याची कामं करतात, पाकिस्तानात सैन्य घुसवलं पाहिजे अशा बाता मारतात.

मात्र स्वतः दिवाळीचा बॉम्ब फुटला तर घाबरतात.

… तर अभिनंदन परतले नसते!

हवाई हल्ल्यांत बॉम्ब जंगलात टाकले गेले.

पाकिस्तानची खरंच 300-400 माणसं मारली असती, तर पाकिस्तानने अभिनंदनला परत केल नसतं असंही राज ठाकरे म्हणाले.

जवानांपेक्षा व्यापाऱ्यांमध्ये जास्त शौर्य आहे असे  पंतप्रधान म्हणतात, मग व्यापाऱ्यांना सिमेवर पाठवा, अशी टीका राज यांनी केली.

खोटं बोलायला काही मर्यादा असतात मात्र निवडणूका जिंकण्यासाठी सर्व मर्यादा पार करत यांच खोटं बोलणं सुरु आहे.

मोदींनी कोरियात जाऊन शांततेचा पुरस्कार घेतला त्यावेळी  मोदींच्या पोझ बघा  , अवार्ड  फिल्म स्टार घेत असल्याचं वाटतं होतं.

नोटाबंदी केल्यानंतर मोदी जपानमध्ये गेले, जपानमध्ये जाऊन भारतीयांची कशी वाट लावली असं ते म्हणाले.

 

अजित डोवालांवर सडकून टीका

जम्मू काश्मीरमधील पुलवामात जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती, त्याकडे दुर्लक्ष  केलं गेलं.

पूर्वसूचना मिळूनही काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान मारले जात असतील तर त्यास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जबाबदार नाहीत का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

पुर्वसूचना मिळूनही हल्ला होतो यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा करतो काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला.

आमच्या जवानांनी त्यांचं काम फत्ते केलं, मात्र त्यांना माहिती चुकीची दिली गेली.

पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे गुप्तपर खात्याचं अपयश असून या संदर्भात काही प्रश्न विचारले तर आम्हाल देशद्रोही ठरवले जाते.

अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्यात दोन पार्टनर पैकी एक अरब आहे तर दुसरा पाकिस्तानी आहे.

जर  इतर पक्षाच्या नेत्यांचा पार्टनर पाकिस्तानी असता तर भाजपने किती थयथयाट केला असता.

पुलवामा हल्यानंतर 29 डिसेंबर रोजी डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार यांची बँकॉकला बैठक झाली.

डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार यांच्यात काय बोलणे झाले?

त्यांची  बोलणी फिस्कटली की यशस्वी झाली ? याबाबत आम्ही प्रश्न विचारायचा नाही का ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थितीत केला.

 

आज राफेल असतं, तर चित्र काही वेगळं असतं

तीन वर्षात राफेल विमानाची किंमत दुपट्ट  झाली आहे. काँग्रेस केवळ विमानाचा सांगाडा विकत घेत होती का ?

बोफोर्स प्रकरण भाजपने काढलं मात्र कारगील युध्दात बोफोर्सची सर्वात जास्त मदत झाली होती.

पुलवामा हल्ल्यावेळी आमच्याकडे राफेल असत तर वेगळ चित्र असतं अस मोदी म्हणतात, हा जवानांचा अपमान आहे.

तुमचा भ्रष्ट्राचार झाकण्यासाठी तुम्ही राफेलचा नाव घेत आहात, तुम्ही अंबानीला काम का दिलं? हा आमचा खरा प्रश्न आहे.

राफेलसंदर्भातले कागदपत्रे चोरीला गेले म्हणतात, तर पुन्हा फोटोकॉपी केलेत असे सांगतात.

चित्रपटासारख्या गोष्टी घडत असून हे सर्व एका पत्रकाराला टार्गेट करण्यासाठी सुरू आहे.

डोकलाम वादाच्या वेळी संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, असे भाजप पसरवत होते.

मग सरदार पटेलांचा पुतळा कोठे बनवला ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

निवडणुकांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे ?

निवडणुकांमध्ये एक, दोन जागा मागायला मी प्रकाश आंबेडकर नाही. लवकरच सर्वांच्या हिताचा निर्णय घेणार आहे.

वैचारिक टीका सहन करा, मात्र शिव्या दिल्या तर घरातून बाहेर काढून मारा, असे आव्हान  राज ठाकरेनी कार्यकर्त्यांना  केलं.

मला जी प्रश्न पडतात, ते तुम्हालाही पडले पाहिजेत,मोदी भक्त कधी सुधारणार नसून त्यांना सोडून द्या असे राज ठाकरे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *