राधाकृष्ण विखे-पाटील कॉंग्रेसचे स्टार प्रचारक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश हा विखे-पाटील यांच्या काँग्रेसमधील भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. अशावेळी विखे-पाटील यांचं काय होणार या विषयी विविध अटकळी बांधण्यात येत होत्या. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील हे महाराष्ट्रामधील कॉंग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहेत.

कॉंग्रेसने आज 40 प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

मुलगा सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यावरही राधाकृष्ण विखे-पाटील यांना कॉंग्रेसने झुकतं माप दिलं आहे.

त्यामुळे विखे पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रामधले स्टार प्रचारक असणार आहेत.

मात्र या यादीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि सत्यजित तांबे यांचा समावेश नसल्याने सगऴ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यादीमध्ये या नावांचा समावेश:

सोनिया गांधी,

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी,

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,

महासचिव प्रियांका गांधी,

मल्लिकार्जुन खर्गे,

गुलाम नाबी आझाद,

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,

राधाकृष्ण विखे-पाटील,

सुशीलकुमार शिंदे,

पृथ्वीराज चव्हाण,

बाळासाहेब थोरात,

मुकुल वासनिक,

विजय वडेट्टीवार,

भाई जगताप,

विलास मुत्तेमवार,

राजीव सातव,

मिलिंद देवरा,

संजय निरुपम,

नगमा,

हर्षवर्धन पाटील,

कुमार केतकर,

कृपाशंकर सिंह,

शिवराज पाटील,

नितीन राऊत,

वसंत पुरके,

चंद्रकांत हंडोरे,

भालचंद्र मुणगेकर,

हुसेन दलवाई,

नसीम खान,

मोहम्मद अझरुद्दीन,

मुझफ्फर हुसेन,

विश्वजीत कदम,

सचिन सावंत,

अमर राजूरकर,

हरिभाऊ राठोड

अमिता चव्हाण

Exit mobile version