Mon. Jan 17th, 2022

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्रींच वयाच्या 85 व्या वर्षी निधन

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. दुपारी 12 वा. कारखाना कार्यस्थळावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राधाकृष्ण विखे – पाटील यांना मातृशोक

श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांचे राहाता तालुक्यातील प्रवरा परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात त्यांचा हातभार होता. प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळासोबत त्यांनी महिलांच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही त्यांचे चांगले योगदान होते.

सिंधुताई विखे पाटील यांनी महिलांसाठी पहिली सहकारी पतसंस्था सुरु केली. पुणतांबा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरु केले. लोणी येथे प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक महाविद्यालयाची स्थापनाही त्यांनी सुरु करून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने, मातोश्री रमाबाई आंबेडकर आदर्श महिला पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. दुपारी 12 वा. कारखाना कार्यस्थळावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *