Fri. Jul 30th, 2021

रामराजे – उदयनराजे वाद विकोपाला, उदयनराजे म्हणाले ‘मी चक्रम आहे’..

सातारा जिल्ह्यातील पाणी बारामतीला देण्यामागे रामराजे निंबाळकर आहेत, असं म्हणत उदयनराजे यांनी त्यांच्यावर थेट शब्दात टीका केली होती. त्या विरोधात पत्रकार परिषद घेत रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजे चक्रम झाले असल्याचा टोला लगावला. तसेच आपण हे प्रकरण अध्यक्ष शरद पवार यांच्या कानी घालणार असल्याचं सांगितलं. तुमच्या खासदाराला आवरा; अन्यथा आम्हाला बाहेरचे दरवाजे मोकळे करा असं मत ही रामराजे यांनी व्यक्त केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी शरद पवार यांनी दोघांनाही पक्षकार्यालात बोलावलं होतं. मात्र तिथेही हा वाद वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत.

रामराजेंची तिन्ही राजेंवर टीका

नीरा देवघर पाणी प्रश्नावरुन चांगलचं राजकारण तापलं आहे.

यावर खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,

यांनी या पाणी प्रश्नावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

या प्रतिक्रीयेनंतर हे तिघेही पिसाळलेले कुत्रे आहेत अशी बोचरी टीका केली होती.

उदयनराजेंकचे प्रत्युत्तर

ज्या जनतेने रामराजेंना विधानसभेत पाठवलं त्यांचाच कालव्याचा प्रश्न मार्गी लागला नाही

बारामतीशी इमानदारीनं चाकरी करायची म्हणुन निरा देवघरचं पाणी बारामतीकडे वळविले.

हे पाणी दुष्काळी जनतेला जाव म्हणुन आमचा प्रयत्न आहे

आम्ही पिसाळलेली कूत्री आहोत हे बोलण आपल्या सभापती पदाला शोभत नाही.

पिसाळलेले कुत्रे चावले तर ह्या वयात इंजेक्शन सोसणार नाही.

सन्मानाने वयाचा विचार करून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला रामराजेंना दिला आहे.

शरद पवारांची मध्यस्थी

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे, रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांची बंद खोलीत चर्चा झाली.

मात्र उदयनराजे चर्चेतून बाहेरआले तर रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला असं ते म्हणाले आहेत.

माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढले असती कुणाचंही ऐकून घ्यायला मी लेच्यापेच्या नाही

मी आहे चक्रम,लोकांवर अन्याय झाला की मी होतो चक्रमअशा शब्दात त्यांनी रामराजेंना सुनावले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *