Wed. Jun 26th, 2019

‘रामराजे बिनलग्नाची औलाद’ रणजितसिंह नाईक- निंबाळकरांची घसरली जीभ

0Shares

यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती प्रचारादरम्यान झालेल्या वैयक्तिक टीका टीपण्णीमुळे. मात्र निवडणुकीच्या निकालानंतरही सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारासंघातील भाजपचे विजयी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वादग्रस्त विधानांचा कित्ता गिरवला आहे.  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे बिनलग्नाची औलाद असल्याचं खालच्या पातळीवरील विधान त्यांनी केलं. माढा येथील विजयानंतर फलटण येथील विजयी सभेत त्यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक- निंबाळकर?

आपणच खरे नाईक-निंबाळकर आहोत.

आमची DNA टेस्ट केली, तर आमच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील.

पण तुमच्या आई- वडिलांचा विवाहतरी झाला होता का? त्यांच्या लग्नाचा दाखला जर कुणी मला दिला, तर 1 हजारांचं इनाम त्याला देऊ.

रामराजे बिनलग्नची औलाद आहेत.

त्यांच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं.

असं वादग्रस्त विधान रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केलं.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून 85 हजार मतांच्या फरकाने मताधिक्याने विजयी झाले होते.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: