Wed. Oct 5th, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वृक्षतोड विरोधी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. वृक्षतोडी विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लॉंग मार्चसह चिपको आंदोलन केलं आहे. अरेंजा कॉर्नर ते कोपरी पर्यंत लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे. कोपरी उड्डाणपुलासाठी ३९० झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याने आंदोलन करण्यात आलं आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत चिपको आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झाडांना अलिंगन देत आंदोलन केले आहे.

आंदोलनाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नेतृत्व करणार आहेत. तर भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ‘झाडे वाचवा, लुटारुंना परत पाठवा’ या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईतील आरे जंगल वाचवणारे मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री नवी मुंबईतील प्रस्तावित वृक्ष कत्तलीबाबत काय भूमिका घेतात, याकडे सा-यांच लक्ष लागले आहे. या आंदोलनाची सुरुवात  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐरोली येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आणि वृक्षारोपण करुन करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.