Jaimaharashtra news

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; शरद पवारांनी भाषण रोखले

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असल्यामुळे राजकीय पक्ष प्रचार आणि दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या माढा मतदार संघातील फलटण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर बाचाबाची झाली.

नेमकं काय घडलं ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; शरद पवारांनी भाषण रोखले

काही दिवसांपासून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याची घोषणा केली.

शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या फलटण येथे आले होते.

यावेळी शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये वाद झाला.

कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान दिल्यामुळे हा वाद झाला.

यामुळे शेखर गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले.

वादामुळे मोठा गोंधळ झाला यामुळे शरद पावर यांना भाषण थांबवावे लागले.

 

Exit mobile version