लातुरात रितेश देशमुखचा रोड शो
जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
लातूर महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे.
यामुळे प्रचारही आता अंतिम टप्प्यात आला. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
या रणधुमाळीत काँग्रेसला यश मिळवण्यासाठी विलासराव देशमुखांचे तिन्ही मुलं प्रयत्नशील आहेत.
प्रचारात अभिनेता रितेश देशमुखनंही भाग घेतला. शहरातल्या मुख्य रस्त्यावरून भव्य रोड शो करत रितेशने प्रचारात एंट्री केली. रितेशच्या या रोड शोला तरुणांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.