Thu. Aug 11th, 2022

लिलावती रुग्णालय अडचणीत

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआय आणि विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्यामुळे लिलावती हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावली आहे. पुढील ४८ तासांत नोटीसीचे उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

लिलावती रुग्णालय प्रशासनाविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळ नवनीत राणा एमआरआय फोटो प्रकरणी लिलावती रुग्णालय प्रशासना विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणा यांचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरलं.

याविषयी रुग्णालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली. यावेळी रुग्णालयाला जाब विचारतानाच किशोरी पेडणेकर यांनी नवनित राणा यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय. त्याचमुळे आता लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.